MAAS recognized as Scientific and Industrial Research Organization (SIROs) by Department of Scientific and Industrial Research (DSIR) under Ministry of Science and Technology, Govt. of India       • MAAS recognized as Research Centre of Savitribai Phule Pune University for the disciplines of Anthropology and Health Sciences.
’हाकारा’- आदिवासी अस्मिता व विकासासाठी प्रबोधन व संशोधन करणारे नियतकालिक.
Hakara Marathi
संस्थेच्या स्थापनेपासूनच सर्वांगीण मानव विकासाच्या द्रुष्टिकोनातुन आदिवासीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी व धोरणकर्ते,प्रशासक,चळवळीतले कार्यकते आणि शिक्षणतज्ञ यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व प्रयत्नांना पूरक म्हणून आदिवासी अस्मिता आणि विकास या मुद्यांना वाहिलेले ’हाकारा’ हे मराठी त्रैमासिक नियतकालिक १९८० सालापासुन परिषदेच्या वतीने अव्याहतपणे प्रकाशीत केले जाते. हाकाराच्या माध्यमातुन आदिवासी कार्यकर्ते, साहित्यिक आणि कवी यांना त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
Hakara
आदिवासी अस्मिता व विकासाविषयक भारतीय भाषेतील हे एकमेव प्रकाशन आहे. प्रख्यात आदिवासी कार्यकर्ते,साहित्यिक आणि मान्यवरांनी आवर्जुन उल्लेख केला आहे,की ’हाकारा’ हे आदिवासी प्रश्नांना वाचा फोडणारे तसेच बौध्दिक उत्तेजन देणारे नियतकालिक आहेच व ’ हाकाराने आम्हाला घडविले देखिल आहे ’ ’हाकारा’ नियतकालिकाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्क्तूती मंडळाचे ’अ’ दर्जाचे प्रकाशन म्हणुन प्रमाणित केले आहे. तसेच या त्रैमासिकाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कूती मंडळाचे अनुदानही मिळते. भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद, पश्चिम विभागीय केंद्राने देखील वेळोवेळी हाकाराला आर्थिक सहाय्य केले आहे. हाकाराचा प्रत्येक अंक हा आदिवासी जिवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा आहे. उदा. जंगल, जमीन, शिक्षण, आरोग्य, आदिवासी
Hakara Brochure
चळवळी भाषा लोक-साहित्य विस्थापन स्त्रियांचे प्रश्न आदिवासी अस्मिता आणि खोटे आदिवासी तसेच कुपोषण, वेठबिगार भटक्या जमाती, लोककला, रोजगार इत्यादी मुद्यांवर हाकाराचे विशेष अंक प्रकाशित झाले आहेत.मानवशास्त्रज्ञ, सामाजिक विचारवंत आणि कार्यकर्ते यांचे हाकाराच्या वाटचालीत मोलाचे योगदान आहे. एम.फिल व पि.एच.डी च्या विद्यार्थ्यांना ’हाकारा’ हे महत्वाचे संदर्भ साधन आहे.

महाराष्ट्र मानव विज्ञान परिषदेची ओळख म्हणून ’हाकारा’ चा नेहमीच गौरवाने उल्लेख केला जातो. महाराष्ट्र मानव विज्ञान परिषदेच्या सर्व प्रमुख उपक्रमात हाकाराने महत्वाची भुमिका बजावली आहे.

Photo Gallery

Video Gallery